मुंबईतील विश्रामगृहात विधानमंडळाच्या माजी सदस्यांसाठी ६ कक्ष राखीव
मुंबईतील विश्रामगृहात विधानमंडळाच्या माजी सदस्यांसाठी ६ कक्ष राखीव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. १९ : मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहातील ६ कक्ष विधानमंडळाच्या माजी सदस्यांसाठी राखीव ठेवण्यात यावेत तसेच त्याचे आरक्षण विधिमंडळ सचिवालयामार्फत करण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुंबईतील विश्रामगृहात विधानमंडळाच्या माजी सदस्यांसाठी ६ कक्ष राखीव

विधानमंडळाच्या माजी सदस्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानमंडळाचे माजी सदस्य जोगेंद्र कवाडे, रामकृष्ण पाटील, प्रकाश गजभिये, रामभाऊ गुंडिले, डॉ. रमेश गजबे, बाळासाहेब साळुंके, दिनानाथ पडोळे, वसंतराव शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रामुख्याने वैद्यकीय उपचारांचा खर्च व मुंबई येथे कामासाठी आल्यानंतर तात्पुरत्या निवासाच्या अडचणीबाबत चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *